यंदा ही महापालिकेचा महाल’ गळती’ ने चर्चेत (व्हिडिओ)
पुणे- सामान्य माणसाचे घरटे चं गळते असे काही नाही , हे या हि वेळेस पुणे महापालिकेची नवी ५० कोटी रुपयांची इमारत पुणेकरांना दिमाखाने जणू सांगते आहे अशी घटना पुन्हा या पावसाळ्यात हि उघडकीस आली आहे.
पुणे महापालिकेची नवी इमारत ,अत्यंत देखणी ,सुंदर आणि मुबलक सुविधा तसेच वाहनतळ उपलब्ध करून देणारी असेल अशी स्वप्ने हि इमारत प्रत्यक्षात उभी राहण्यापूर्वी पाहिली जात होती . प्रत्यक्षात इथे मोठ मोठी सुंदर दालने महापौर आणि पदाधिकारी यांच्यासाठी साकारली गेली .सभागृह देखील भले मोठे साकारले गेले .पण या वस्तूचे उद्घाटन गेल्या वर्षी होतानाच चक्क महापालिकेच्या सभागृहात गळती लागल्याने अक्षरशः बादल्या लावल्या गेल्या . त्यानंतर तरी इमारतीची वर्षभरात व्यवस्थित देखभाल दुरुस्ती झाली असेल अशी कल्पना देखील फोल ठरली . घाणेरडी स्वच्छता गृहे ,अपुरे अस्त्याव्यस्त वाहनतळ असे चित्र सातत्याने पुढे येत असताना आता ..नव्या वास्तूत ..असलेली लिफ्ट चक्क दबदबा गळू लागली आहे .जेवढा जोरात पाऊस तेवढा मोठा लिफ्ट मध्ये धबधबा दिसताच तातडीने हि लिफ्ट आता बंद ठेवून दुरुस्तीच्या कामाला पालिका लागली असली तरी महालाची हि दुरवस्था चव्हाट्यावर मात्र आली आहे …. पहा याबाबत माजी विपक्ष नेते आणि राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी काय म्हटले आहे …..