मॉल आणि मल्टिफ्लेक्स ला पार्किंग शुल्क देवू नका – बालवडकर
पुणे-मॉल आणि मल्टिफ्लेक्स येथे पार्किंगच्या जागा कायद्याने सार्वजनिक पार्किंग च्या जागा असल्याने येथे कोणालाही पार्किंग शुल्क घेण्याचा अधिकार नसताना बेकायदेशीर रित्या पार्किंग शुल्क घेतले जात आहे. त्यांनी अशा प्रकरचे बेकायदा कृत्य त्वरित थांबवावे अन्यथा त्यांच्यावर महापालिकेच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देताना शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी ग्राहकांना हि अशा प्रकरच्या बेकायदा शुल्क वसुलीला विरोध करा ,जबरदस्तीने अशी वसुली करणाऱ्यांविरोधात तक्रारी करा असे आवाहन केले आहे . आज बालवडकर यांनी याबाबत महापालिकेकडून बजावण्यात येत असलेल्या नोटिसांची प्रत पत्रकारांना दाखविली .