पुणे- हडपसर विधानसभा मतदार संघ आणि महापालिकेचा प्रभाग २६ मध्ये झालेला डुकरांचा सुळसुळाट,पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट आणि अन्य समस्या बाबत महापालिकेतील या प्रभागाचे शिवसेना नगरसेवक आणि हडपसर विधानसभेसाठी इच्छुक असलेले नाना भानगिरे यांनी काल जाहीर केल्याप्रमाणे आज थेट महापालिकेवर मोर्चा आणला आणि यावेळी शिवसैनिकांनी महापालिका भवनाच्या आवारात डुकरे सोडण्याचा प्रयत्न केला . पोलीस आणि सुरक्षा रक्षक यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न गेटवरच केला पण तो असफल झाला ,मात्र याच वेळी महापालिका भवनाच्या पायऱ्यांवर बसून या आंदोलनात नाना भानगिरे यांच्या समवेत सत्ताधारी असलेले भाजपचे हडपसर येथील आमदार योगेश टिळेकर आणि नगरसेवक उमेश गायकवाड हे देखील सहभागी झालेले दिसले .
शंभरावर पत्रे दिली पण या परिसरातील डुकरांचा बंदोबस्त केला जात नाही,डुकरांनी लहान मुलांना अपघात होण्याचे प्रकार वाढत चालले आहेत . या परिसरात अतिक्रमणांनी हिंदोस मांडून वाहतुकीचा बट्ट्याबो ळ केला आहे आणि अतिक्रमण प्रमुख आपल्या हस्तकाकरवी हप्ते खात आहेत . अशी अवस्था झालेली असताना आता या परिसरात पाण्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले जात आहे . पिण्याच्या पाण्यापासून या परिसराला वंचित ठेवले जाते आहे असा आरोप करत हा मोर्चा नगरसेवक नाना भानगिरे यांनी काढला . यावेळेची पहा हि व्हिडिओ दृश्ये ….