पुणे : महापालिकेतील 15 पैकी 12 प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद भाजपच्या नगरसेवकांना मिळाले. विशेष म्हणजे, संख्याबळानुसार 11 जागांवर तर चिठ्ठी च्या माध्यमातून एका जागेवर भाजपला बोनस मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या वाटेला तीन समित्यांचे अध्यक्षपद आले. या समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी आज सोमवारी निवड झाली. या निवडणुकीत उमेदवार देऊन भाजपविरोधात दंड थोपटण्याची तयारी केलेल्या शिवसेनेने आयत्या वेळी भाजपला साथ दिली.महापालिकेच्या 15 प्रभाग समित्यांची मुदत संपल्याने त्यासाठी निवडणूक झाली. प्रभाग समित्यांमधील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 11 समित्यांचे अध्यक्षपद अपेक्षित आले. या जागांवरचे उमेदवार निवडून आले. त्यानंतर विरोधी पक्षांचे उमेदवारांना तीन जागांवर विजय मिळाला. त्यानंतर ढोले पाटील प्रभाग समितीसाठी काढलेल्या चिठ्ठीत भाजपच्या मंगला मंत्री यांचे नाव निघाले.
नवे अध्यक्ष- प्रभाग समिती
ज्योती कळमकर- औंध-बाणेर
आदित्य माळवे- शिवाजीनगर-घोले रोड
निता दांगट- सिंहगड रस्ता
रत्नप्रभा जगताप -वानवडी-रामवाडी (राष्ट्रवादी )
मनिषा कदम- कोंढवा-येवलेवाडी
स्मिता वस्ते -कसबा-विश्रामबागवाडा
प्रवीण चोरबेले -बिबवेवाडी
मारुती सांगडे- येरवडा-कळस-धानोरी
छाया मारणे -कोथरुड-बावधन
मुक्ता जगताप- नगर रस्ता-वडगावशेरी
मंगला मंत्री -ढोले-पाटील रस्ता
युवराज बेलदरे -धनकवडी-सहकारनगर (राष्ट्रवादी )
जयंत भावे- वारजे-कर्वेनगर
पूजा कोद्रे- हडपसर-मुंढवा (राष्ट्रवादी )
सुलोचना कोंढरे- भवानी पेठ