पुणे-चुकीचे आरोप आणि अन्याय यांचा प्रतिकार आता करायलाच हवा,निंबाळकर यांच्यावर झालेला हल्ला हा संस्थेवर झालेला हल्ला आहे अशा शब्दात महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी
अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकारचा निषेध नोंदविला . अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मंगळवारी पुणे महापालिकेच्या कर्मचारी वर्गाने काम बंद आंदोलन केले.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या निषेध सभेत ते बोलत होते .