पुणे-महापालिका मुख्य सभेने कात्रज कोंढवा रस्त्याचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे शरद पवार आणि मनसेचे बाळा नांदगावकर यांच्या हस्ते करण्याचा ठराव केलेला असताना हा ठराव धुड्कारून होत असलेल्या कात्रज कोंढवा रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात जर मुख्यमंत्री सहभागी झाले तर त्यांचा अशा बेकायदा उद्योगांना पाठींबा आहे असा अर्थ घ्यायचा काय ? असा सवाल आज येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महापालिकेतील विरोधीपक्षनेते चेतन तुपे पा. यांनी केला आहे .
सध्या बदनामी च्या वावटळीवातावरणात सापडलेले भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या पुढाकाराने कात्रज कोंढवा रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होतो आहे .या पार्श्वभूमीवर तुपे पाटील यांनी हा सवाल उपस्थित केला आहे ..पहा आणि ऐका नेमके तुपे पाटील काय म्हणाले आहेत …