पुणे- यंदा पुरेसा पाऊस झाला आहे ,धरणात आवश्यक तेवढा पाणी साठा देखील झाला .पाटबंधारेला थकीत रकमेतील ६५ कोटी देखील देण्यात आले .तरीही पुणेकरांवर पाणी कपातीची तलवार का चालविण्यात येते आहे . असा सवाल कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने केला आहे . राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी हा पवित्रा जाहीर केला ,’ हि पाणी कपात नाही असे सांगत ,भाजप प्रत्यक्षात पाणी कपात लादत आहे असा आरोप केला तर , कॉंग्रेस पक्षानेही आज याप्रकरणी महापौर मुक्ता टिळक यांची भेट घेऊनच या पाणी कपातीचा धिक्कार केला ,नियोजन अभावी पाणी असूनही पुणेकरांच्या तोंडचे पाणी सणासुदीच्या दिवसात तरी पळवू नका अशी मागणी करत माजी आमदार मोहन जोशी ,नगरसेवक अविनाश बागवे ,लता राजगुरू, पीएमटी चे माजी अध्यक्ष शेखर कपोते आदी कॉंग्रेस जणांनी महापौरांना प्रत्यक्ष भेटून टँकरची प्रतिकृती भेट देवून आपला निषेध नोंदविला .
यावेळी महापौर टिळक यांनी ,’ हि कपात नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला ,पण आपण सांगता एक आणि करता एक .. हे लवकरच सिद्ध होईल असे सांगून , पाणी कपात करू नकाच अशी मागणी मोहन जोशी यांनी केली .