पुणे- अधिकाऱ्यांच्या हेकेखोर स्वभावामुळे पुण्याचे नुकसानहोत असल्याचा आरोप करत आज भाजपच्या नगरसेविका आणि महिला बालकल्याण समितीच्या माजी अध्यक्षा राणी रायबा भोसले यांनी थेट अतिरिक्त आयुक्तांवर आणि त्यांच्या स्वभावावर प्रहार करत त्यांची बदली करण्याची मागणी केली आहे .तर याच वेळी महापालिकेतील सर्वच कामगारांचा पगार कमी करण्याचा डाव याच अतिरिक्त आयुक्त यांनी रचल्याचा आरोप करत या प्रकाराविरुद्ध १७ जुलै रोजी पीएमसी एम्प्लॉईज युनियन ने महापालिका भवनासमोर सर्व कामगार ,कर्मचारी आणि अधिकारी यांना घेवून मोठे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे .
अतिरिक्त आयुक्त शीतल उगलेंंच्या हेकेखोरपणामुळे पुण्याच्या विकासाला खिळ- राणी भोसले (व्हिडीओ)
ग्रेड पे च्या नावाने , महाराष्ट्र शासनाच्या वेतन पद्धतीच्या नावाने महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा घाट अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी घातल्याचा दावा या युनियनचे अध्यक्ष बापू पवार आणि सेक्रेटरी चंद्रकांत शितोळे यांनी केला आहे . तर नगरसेविका राणी भोसले यांनी सांगितले कि , महापालिकेतील सर्व खाते , अधिकारी यांची मान्यता असते पण केवळ या अतिरिक्त आयुक्तानांच तो अमान्य होतो असे ७० ते ८० प्रस्ताव त्यांनी रिजेक्ट केले आहेत . नगरसेविका आणि नगरसेवक आपापली कामे घेवून त्यांच्या कार्यालयात गेले कि त्या रागानेच बोलतात . अरेरावी आणि हेकेखोरपणा यामुळे त्यांनी चालविलेला कारभार पाहता त्यांची तातडीने बदली करायला हवी . प्रत्यक्ष नागरिकांना उत्तरे देणे , आणि आमच्या कारकिर्दीत काय केले हे आम्हाला सांगावे लागते आणि अशा अधिकाऱ्यांमुले आम्हाला नागरिकांचा रोष पत्करावा लागतो आहे . …पहा नेमके या संदर्भात नगरसेवका भोसले आणि कामगार युनियनचे पदाधिकारी नेमके काय म्हणाले ……