पुणे : महापालिका अधिकाऱ्याला मारहाण होणे ,त्याच अधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होणे ,त्याच्यावर पैसे मागितल्याचे आरोप असणे यावरून आज पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि काँग्रेसचे गेटनेते अरविंद शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली .
अतिक्रमण अधिकारी किशोर पाडळ यांना एक हॉटेलवर कारवाई केल्याच्या प्रकरणी महापालिकेत येवून मारहाण झाली होती. त्यावरून काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह काही सभासदांनी सवाल उपस्थित केला. अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत असल्याचे मतही काही सभासदांनी व्यक्त केले. ही चर्चा सुरु असताना भिमाले यांनी पडाळे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल असून त्या अधिकाऱ्याची बाजू शिंदे का घेत आहेत, असा प्रश्न उपस्थित करीतत्यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली. हा एजंट आहे, हा गरिबांचे पैसे खातो, हा फ्रॉड माणूस आहे’या अशा शब्दात भिमाले यांनी आरोप केले. त्यावर अधिकाऱ्यांना केबिनमध्ये येऊन मारहाण करणे चुकीचे असून त्यांना संरक्षण मिळावे अशी भूमिका अरविंद शिंदे यांनी घेतली..या प्रकारामुळे मुख्य सभेत चांगलाच गोंधळ माजला. अखेर महापौर आणि स्थायी समितीच्या अध्यक्षांसह माजी अध्यक्षांनी तसेच अविनाश बागवे ,दीपक पोटे,राजेश येनपुरे,महेश वाबळे ,गोपाल चिंतल,प्रवीण चोरबोले ,शंकर पवार आदी नगरसेवकांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.