पुणे –
आज कोथरूड डेपोच्या जागेवर शिवसृष्टी का मेट्रो स्टेशन या बाबतचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती मध्ये मुंबई येथे घेण्यात आला यामध्ये कोथरूड येथे मेट्रो स्टेशन होणार यांवर शिकामोर्तब करण्यात आले आहे. त्या पार्श्ववभूमीवर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित यांनी पत्रकार परिषदचे आयोजन केले होते. यावेळी दीक्षित म्हणाले कि कोथरूड येथेल २८ एकर जागा मेट्रो स्टेशनला देण्याबाबत आज महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याने वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गाच्या कामाला वेग मिळणार आहे. तसेच मेट्रोला आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे पुढील कालावधीत सर्वाचं मार्गिकांवरचे काम वेगाने होणार असून प्रत्येक मार्गिकेवर प्रतिमहिना २५ पिलर उभारण्याचे उद्दिष्ट महामेट्रोने समोर ठेवले असल्याचे ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले. तसेच पुणे महापालिकेच्या मागणी नुसार स्वारगेट ते कात्रज मार्गाचे तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मागणीनुसार चिंचवड ते निगडी मर्गाचा डीपीआर बनवण्याचे काम हाती घेण्यात आले असून पुढील ४ महिन्यात ते पूर्ण होणार असल्याचे दीक्षित यांनी सांगितले
महापालिकेच्या मागणी नुसार स्वारगेट ते कात्रज मार्गाचे तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मागणीनुसार चिंचवड ते निगडी मार्गाचा डीपीआर बनवण्याचे काम मेट्रोने हाती घेतले असून ते पुढील ४ महिन्यात पूर्ण होणार असल्याचे ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.मेट्रोला आवश्यक असणाऱ्या सर्व परवागी आणि जागांची उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पुढील कालावधीत पुणे मेट्रोच्या कामाला वेग मिळणार असून प्रत्येक मार्गावर प्रति महिना २५ पिलर उभरण्याचे उद्दिष्ट्य महामेट्रोने ठेवले असल्याची माहित महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.