पुणे- पसंतीचे उमेदवारच नसतील तर NOTA चा पर्याय वापरा पण मतदान टाळू नका, कोणीही पसंतीचे नाही म्हणून मतदानाचा हक्क डावलू नका असे आवाहन ‘सलाम पुणे ‘च्या वतीने करण्यात आले असताना , जाणून बुजून NOTA दाबून मत वाया घालवू नका असा अपप्रचार पुण्यातून सोशल मिडिया मधून काही लोकांकडून सुरु झाला होता .
लोकशाही सदृढ करण्यासाठी मतदान करा , उमेदवारांना नावे ठेवून मतदान टाळणे म्हणजे …. अशा उमेदवारांना … जे तुम्हाला पसंत नाहीत त्यांना अप्रत्यक्ष साथ देणे होय आणि पसंतीच्याच उमेदवारांना मते द्या नापसंती स्पष्ट पणे NOTA चा पर्याय वापरून नोंदवा अशी भूमिका ‘सलाम पुणे’ ने स्पष्ट केली
दरम्यान केंद्रीय विद्यालय पुणे-६ येथील मतदान केंद्रावरील हा पहा फोटो .