पुणे : झाडाची फांदी डाेक्यात पडून एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील आपटे रस्त्यावर ही घटना आज दुपारी बाराच्या सुमारास घडली.विशेष म्हणजे पोलिसांनी या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी महापालिकेवर मात्र गुन्हा दाखल केलेला नाही.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी 12 च्या सुमरास जयश्री जगताप (वय 35) या आपटे रस्त्यावरील संताेष बेकरीजवळ झांबल्या हाेत्या. त्यावेळी त्या ठिकाणच्या एका झाडाची कुजलेली फांदी त्यांच्या डाेक्यात काेसळली. नागरिकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु डाॅक्टरांनी महिलेला मृत घाेषित केले
महिला दिव्यांग असल्याची प्राथमिक माहिती समाेर आली आहे. ज्या ठिकाणची फांदी पडली ती फांदी सुरक्षेच्या दृष्टिकाेनातून अर्धी कापण्यात आली हाेती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
याप्रकरणी डेक्कन पाेलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.