पुणे :
पोलीस उपनिरीक्षक पदांची भरतीबाबत युवकांच्या मागणीस खा.वंदना चव्हाण यांचा पाठींबा
‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’मार्फत होणार्या परिक्षेतून पोलीस उपनिरीक्षक (पी.एस.आय.) पदांची भरती दोन वर्षांपासून झाली नसल्याने युवक वर्गात असलेल्या नाराजीची दखल घेत या परीक्षा लवकर घ्याव्यात अशा मागणीस खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी पाठींबा दिला आहे.
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून राज्य पोलीस दलात जाऊ इच्छिणार्या युवक, युवतींना पी.एस.आय. पदासाठी परीक्षा देण्याची संधी मिळावी, आणि युवकांना या संदर्भात चर्चेसाठी वेळ द्यावा अशी मागणी खा.वंदना चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या संदर्भात ‘एमपीएस्सी स्टुडंस् राईट कमिटी’, पुणे यांच्या मागण्यांना खा. वंदना चव्हाण यांनी पाठींबा दिला आहे.