पुणे -शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीवर घाला घालणाऱ्या भाजप सरकारचा पुरम चौकात(अभिनव कॉलेज चौक)येथे निषेध आंदोलन करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील म्हणाले की जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ज्या मागण्यांसाठी उपोषण करत आहेत त्या मागण्यांवर हे सरकार सत्तेवर आले आहे आणि आज अण्णा हजारे नि त्या मागण्यांचे पत्र पंतप्रधान यांना पाठविले असता त्यांनी शुभेच्छा म्हणून अण्णा हजारेंना परत पत्र पाठविले , लोकशाही ची थट्टा या सरकारने चालविली आहे .लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर हे सरकार दडपशाही करीत आहे. मुख्यमंत्री तर विरोधी पक्षाच्या नेत्यांना कुत्ते म्हणून संबोधत आहेत.ज्या घटनेने देश एकसंध ठेवण्याचे काम केले त्या घटणेला आव्हान हे जातीयवादी सरकार देत आहे. भारतीय लोकशाही वर घाला घालण्याचे काम या सरकारकडून होत आहे.यावेळी नगरसेवक सुभाष जगताप,शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष निलेश निकम, महिला शहराध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक अध्यक्ष राकेश कामठे,सामाजिक न्याय अध्यक्ष बापु डाकले,ओ.बी.सी शहराध्यक्ष संतोष नांगरे,पर्वती अध्यक्ष नितीन कदम,प्रवक्ते भूषण राऊत,प्रदीप देशमुख,फहिम शेख,अर्चना हनमघर,अर्चना चंदनशिवे,स्वाती पोकळे,सुरेखा दमिष्टे,शांतिलाल मिसाळ,अजय दराडे,युसुफ शेख,अमोल ननावरे,महेश हांडे,रुपेश संत,अच्युत लांडगे,प्रेम भांडे,विकी वाघे,समिर पवार,राजाभाऊ सावंत,अमोघ ढमाले, संजय खोपडे,सदाशिव गायकवाड,संजय लोणकर,विनोद पवार,संजय दामोदरे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.