पुणे- जानकरांनी धनगर समाजाच्या नावानं मंत्री पद मिळविलं,पण नंतर धनगर आरक्षणावर काहीही न करता धनगर समाजाची फसवणूक केली आहे, त्यांनी केवळ स्वार्थासाठी या समाजाच्या नावाचा उपयोग करून घेतला असा आरोप आज शर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी केला.
शहर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजप-सेना युती सरकारने धनगर व मुस्लिम समाजातील लोकांना आरक्षण देतो असे सांगुन त्या समाजाची जी फसवणुक केली आहे त्या फसवणुकीचा व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला व जिल्हाधिकारी राम यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यानी सत्तेवर आल्यावर पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देउ असे सांगितले होते पण सत्त्ता येउन चार वर्षे होत आली पण राज्य सरकारने आरक्षणाचा साधा प्रस्ताव सुध्दा केंद्र सरकारकडे पाठविलेला नाही ,मुख्यमंत्र्यानी आणि जाणकारांनी आरक्षणाच्या नावाखाली धनगर आणि मुस्लिम समाजाची फसवणूक केली आहे याचा आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे निषेध करतो.
प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले की, भाजप- सेना सरकारने अनेक आश्वासने देउन लोकांना जनतेला फसविले यांच्या जाहिरनाम्यातील एक ही आश्वासन हे सरकार पुर्ण करु शकलेले नाहीये. फक्त मोठी मोठी भाषण करायची लोकांना आश्वस्थ करावयाचे मते मिळवायची आणि नंतर काय बोललोय त्याबद्दल एक वाक्य की काढायचे नाही अशा या दुट्ट्प्पी सरकारला एक मिनिट सुध्दा सत्तेवर राहण्याचा आधिकार नाही.
मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची बाजु कोर्टात व्यवस्थितपणे या जातीयवादी सरकारने मांडली नाही त्यामुळे मुस्लिम समाजाचे आरक्षण कोर्टात टिकले नाही. हे सरकार जातीयवादी आहे यांना मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचेच नाही यांना फक्त समाजाची मते पाहिजे असल्याने हे फक्त आरक्षणाचे गाजर दाखवित आहेत यापुढील काळात मुस्लिम समाज यांच्या भुलथापाना बळी पडणार नाही असे नगरसेवक गफुऱ पठाण म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस ओ.बी.सी विभागाचे अध्यक्ष संतोष नांगरे म्हणाले भाजप सरकारने फक्त महादेव जाणकरांना मंत्रीपद दिले व धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसली या सरकारने जर लवकरात लवकर आरक्षण दिले नाही तर या सरकरमधील मंत्र्याना रस्त्यावर फिरु देणार नाही. आंदोलनासाठी शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील, प्रवक्ते अंकुश काकडे, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, बाळासाहेब बोडके,नगरसेवक गफुर पठाण,प्रदिप गायकवाड,युवक अध्यक्ष राकेश कामठे, ओ.बी.सी अध्यक्ष संतोष नांगरे, रईस सुंडके,प्रदिप देशमुख,भोलासिंग अरोरा,स्वप्नील दुधाणे,विद्यार्थी अध्यक्ष रीशी परदेशी,हाजी फिरोज,फहिम शेख माणिकशेठ दुधाणे,दिलीप अरुंदेकर,मिलिंद वालावडकर,चंद्रकांत कवडे, डॉ.सुनिता मोरे,उज्वला देशकर,निता गलांडे,शांतिलाल मिसाळ,सागर भोसले,महेश हांडे,हरीष लडकत,रुपेश आखाडे,छबिल पटेल,हेमंत येवलेकर,संजय गायकवाड,विकी वाघे, विकी मोरे,दिपक लोंढे,राजाभाउ सावंत,मयुर गायकवाड,विजय जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.