पुणे- गेली अडीच वर्षांपासून महर्षी कर्वेंच्या स्मारकाची अवस्था दयनीय झालेली असून अवघ्या ५० लाखापर्यंतच्या या कामाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून सत्ताधारी भाजप भारतरत्न महर्षी कर्वेंची उपेक्षा करत आहे असा आरोप करत आज शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने कोथरूड येथे कर्वे स्मारकाचे काम चालू असलेल्या स्थळी जोरदार निदर्शने केली .राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महापालिकेतील मावळते विरोधीपक्षनेते चेतन तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हि निदर्शने करण्यात आली .
स्त्री सन्मान व स्त्री- शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेख्लीय कामगिरी करणाऱ्या भारतरत्न महर्षी डॉ कर्वे यांच्या कर्वे रस्त्यावरील पुतळा शुशोभिकारणाच्या नावाखाली गेल्या दोन ते तीन वर्षापासून हटविण्यात आलेला असून पुतळ्याचे काम देखील बंद अवस्थेत सुरू आहे. बहुतांशी पुणेकरांच्या भावना दुखावल्या जात असून भारतरत्न मिळाल्यानंतर सुद्धा भाजप शिवसेनेच्या सत्ताधारी कडून विसर पडला आहे की काय ? असा सवाल करीत दोन महिन्यांपूर्वी महर्षी अण्णांच्या पुळ्याच्या कामास गती मिळून काम पूर्ण न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस कोथरुड मतदारसंघ तर्फे स्वः निधी उपलब्ध करून स्वतः श्रमदानातून पुतळा उभा करू असे यावेळी चेतन तुपे म्हणाले..
कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने, विजय (बापू) डाकले, नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने, नंदिनी पानेकर अर्चना चंदनशिवे, रजनी पाचंगे, मिलिंद वाळवडकर, संजय खोपडे, किशोर कांबळे, प्रमोद शिंदे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते