राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने ‘कॉफी विथ स्टुटंड ’उपक्रम
पुणे : ‘राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस’ पुणे शहरच्या वतीने ‘कॉफी विथ स्टुटंड’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज दिनांक 12 फेब्रुवारी रोजी शहराध्यक्ष, खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी फर्गुसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भेट घेतली. भेटी दरम्यान विद्यार्थ्यांसमवेत कॉफी घेऊन त्यांच्या समस्या, अडचणी समजून घेतल्या. या समस्या सोडवण्यासंदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्रसिंह परदेशी यांच्याशी तातडीने चर्चा करण्यात आली व लवकरात लवकर प्रश्न सोडवावे अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष ऋषी परदेशी, प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे, राष्ट्रवादी युवती शहराध्यक्ष मनाली भिलारे, संध्या सोनावणे, केशव माने, रवी आमरावती, राज पाटील, साई होळकर, सौरभ माने,वैभव थरकुडे, व विद्यार्थी मोठ्या संख्याने उपस्थित होते.
या भेटी नंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बर्याच समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये प्रमुख्याने स्वच्छतागृहची दुरावस्था, वसतिगृहामध्ये पाण्याची समस्या, महाविद्यालयाच्या सुरक्षा भिंती, परत तपासणीचे पेपर दाखवण्यात बाबत आदी समस्यांचा समावेश होता. खासदार वंदना चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद सादत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्काळ प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
‘कॉफी विथ स्टुटंड’ या उपक्रमाची संकल्पना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष ऋषी परदेशी यांची आहे. या उपक्रमांतर्गत पुण्यातील विविध महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांसमवेत कॉफी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि महाविद्यालय पदाधिकार्यांशी चर्चा करून शक्य तितक्या समस्या तत्काळ सोडविणे हा प्रमुख हेतू आहे. या उपक्रमात पक्षाचे ज्येठ नेते देखील सहभागी झाले आहेत. आत्तापर्यंत स.प.महाविद्यायल, वाडिया कॉलेज येथे भेटी देण्यात आल्या.