महात्मा फुले मंडळाच्या वतीने सारसबाग येथील सावित्रीबाई फुले स्मारकास भेट देवून महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सावित्रीमाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . या प्रसंगही महात्मा फुले मंडळ चे अध्यक्ष मधुकर राऊत, कार्याध्यक्ष सुरेश बोराटे, माजी आमदार कमलताई ढोले पाटील, सौ. रेखा आखाडे, श्रीमती उषा भगत इत्यादी उपस्थित होते.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हिराबाग येथील पक्ष कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
शिक्षणमंडळ माजी अध्यक्ष वासंती काकडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी मनिषा भोसले, सुरेश पवार, दत्ता एकबोटे, सुरेश खाटपे, किरण रानडे, अविनाश वेल्हाळ, राजेश शहा, योगेश वराडे, संजय गायकवाड, वैभव जाधव, संजय गाडे, घनश्याम खलाटे, बाळासाहेब ढमाले, हेमंत येवलेकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.