पुणे-गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विठ्ठलपार्क व शिवपुष्प पार्क पावसाळी लाईन चा प्रश्न अखेर निकाली निघणार आहे .नगरसेविका.सौ.मंजुषा नागपुरे यांनी या कामासाठी निधी मंजूर केला असून, कामाचे भूमिपूजन स्थानिक नगरसेवक व नागरिक यांच्या हस्ते करण्यात आले .पावसाळ्यात, या दोन्ही ठिकाणी पाणी साचून राहून, नागरिकांची गैरसोय होत होती . यातून वाहतुकीस अडथळा होऊन, व वाहतूक अपघाताचा धोका संभवत होता.गेली अनेक वर्षे, येथील नागरिक ही मागणी करत होते . सौ.नागपुरे यांनी तातडीने निधी मंजूर करून, कामास गती दिली . भूमिपूजन प्रसंगी नगरसेवक.दादा जगताप, ज्योतीताई गोसावी, तसेच सामाजिक कार्यकर्ते संकेतजी जोशी, हृषीकेश सुमंत, अभिजित कदम, श्री.कुलकर्णी व परिसरातील नागरिक उपस्थित होते