पुणे-महापालिकेचा लोगो छातीवर झळकवून तुम्हाला जर पालिकेचे अधिकारी,कर्मचारी म्हणून मिरवायचे असेल , शायनिंग मारायची असेल किंवा एखादी सुरक्षा भेदायची असेल तर अशा लोकांना नामी संधी सहज उपलब्ध करवून देणारी बाब एका पुणेकराने उघडकीस आणली आहे . ती म्हणजे पुण्यातील मध्य वस्तीत शिवाजी रोड वर मामलेदार कचेरी जवळ महापालिकेचा लोगो असलेले टी शर्ट विकत मिळत आहेत . या पुणेकराने येथील दुकानात शो केस मध्ये लावलेल्या या टी शर्ट चे फोटो ,दुकानासह मोबाईलवर काढून माय मराठी कडे पाठविले आहेत .
हि बाब अत्यंत धक्कादायक असून या परिसरातील कार्यकर्ते ,नगरसेवक ,अधिकारी यांच्या लक्षात कशी आली नाही हे समजू शकलेले नाही .असंख्य बड्या बड्या घोटाळ्यांची चौकशी ज्या महापालिकेत गुंडाळून ठेवली गेली अर्थात त्या महापालिकेत याबाबत चौकशी केली जाईल अशी अपेक्षा नाही .त्यामुळे कोणी माहिती अधिकार कार्यकर्त्यांने या गौडबंगाला चा पर्दाफाश करावा अशी मागणी या पुणेकराने केली आहे .