पुणे- मोहनकुमार भंडारी यांनी ‘रस्त्यावर एका अनोळखी कलाकाराच्या कडून कानावर आलेले बासरीचे स्वर … थिएटरमध्ये पोहोचविले ..आणि क्षणार्धात सारे सभागृह उठून बासरीच्या त्या लयात स्वतः गाऊ लागले … असा एक दुर्मिळ आणि अनोखा प्रसंग ‘मॉम इंडिया ‘ च्या ४४ व्या वर्धापन दिन सोहळ्यात अनुभवायला मिळाला . बाबा जाधव असे या कलाकाराचे नाव आहे . रस्त्यावर बासरी वाजवून हौस आणि निर्वाह भागविणारा हा कलाकार भंडारी यांनी आपल्या समारंभात रसिकांपुढे पेश केला . आणि त्याच्या बासरीच्या सीडी सह रसिकांना तो भावलाच नव्हे तर रसिकांचा तो चक्क ग्रेट अनुभवच ठरला … पहा आणि ऐका प्रत्यक्ष हा प्रसंग .