पुणे-50 लाखाच्या खंडणीप्रकरणी आमदार योगेश टिळेकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यंच्या अटकेची तयारी सुरु केली म्हणूनच कोंढव्यातील पोलीस अधिकारी मिलिंद गायकवाड यांची तातडीने बदली करण्यात आली असा आरोप करत ,त्यांची बदली रद्द करा ,आणि आमदारांना अटक करा अशा मागणी साठी मनसे चे नगरसेवक वसंत मोरे यांनी आज कोंढवा पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. हा मूक मोर्चा आहे,एवढ्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शहाणे व्हावे ,राजकीय दबावाखाली प्रामाणिक अधिकाऱ्यांची गळचेपी करू नये ..अन्यथा आम्हाला ठोक मोर्चा काढावा लागेल असा इशारा मोरे यांनी यावेळी दिला …