पुणे-लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेनच्यावतीने दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . हा कार्यक्रम विश्रांतवाडी येथील कस्तुरबा हौसिंग सोसायटीमधील कस्तुरबा हॉलमध्ये संपन्न झाला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायंस क्लब के अध्यक्ष लायन राजेश अग्रवाल , प्रमुख पाहुणे म्हणून पुणे शहराचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे ,दिल्ली येथील अखिल भारतीय अग्रवाल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीपजी मित्तल , शिवाजी चमकीरे, कार्यक्रमाचे संयोजक लायन रवि अग्रवाल, सचिव लायन राजेश बंसल, कोषाध्यक्ष लायन उमेश अग्रवाल व मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते .
यावेळी ३०० हुन अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देउन सन्मानित करण्यात आले . तसेच भविष्यकाळात या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेन अग्रस्थानी राहील असे आश्वासन यावेळी क्लबच्या सदस्यांनी दिले .
क्लबच्यावतीने वर्षभरात ४७८ सेवा प्रकल्पांची माहिती देण्यात आली . प्रमुख पाहुणे लायन शिवाजी चमकीरे यांनी लिओ इंटरनेशनलच्या माध्यमातून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .पुण्यात नव्या लियो क्लब माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील माहिती देण्यात आली . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अग्रवाल क्लासेस व सत्यम ग्रुप यांनी विशेष योगदान दिले .