उंड्री -वडाचीवाडी रस्त्यावर “माणुसकीची भिंत”
पुण्यातील उंड्री परिसरातील वडाचीवाडी रस्त्यावर ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन पुणेकर व अस्टोनिया क्लासिक सोसायटी यांच्या संकल्पनेतुन साकारलेल्या “माणुसकीची भिंत” या स्तुत्य उपक्रमाची सुरवात आरोग्यम आश्रमाचे संस्थापक योगगुरू अनंत झाम्बरे यांच्या हस्ते उदघाटन करून करण्यात आली. शनिवार पासून हा उपक्रम सर्वांसाठी खुला करण्यात आला आहें.
या कार्यक्रमाची संकल्पना विशद करताना संयोजक सचिन पुणेकर म्हणाले कि वापरात नसलेले कपडे, चादरी आणि इतर गृहउपयोगी वस्तू या भिंतीला अडकवायच्या आणि ज्यांना ज्या वस्तूंची गरज असेल, त्यानं त्या वस्तू घरी न्यायच्या, अशी माणुसकीच्या भिंतीमागची संकल्पना आहे. परिसरातील नागरिकांनी या समाजउपयोगी उपक्रमात सहभागीं होऊन ही लोकचळवळ यशस्वी करण्यास हातभार लावावा अशी त्यांनी विनंती केली आहे. रोटरी क्लब च्या देवाणघेवाण कार्यक्रमांतर्गत कोलंबिया तुन भारतात आलेल्या मोरा व्हलेण्टिना यांनी या उपक्रमाला भेट देऊन प्रशंसा केली.
बायोस्फियर चे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. सचिन अनिल पुणेकर व रोटरी क्लब पुणे चे संचालक अतुल सलाग्रे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला उद्योगपती राजेंद्र भिंताडे, नानासाहेब बांदल, सरपंच दत्तात्रय बांदल, उत्तम फुलावरे, विशाल कामठे, प्रफुल्ल कदम, साधू शेंडकर, मयूर कामठे, विजय कामठे, अविनाश पुणेकर, कैलास पुणेकर, अस्टोनिया क्लासिक चे सर्व सदस्य आणि परिसरात सोसायटयांचे नागरिक उपस्थित होते.
प्रायोगिक तत्वावर चालू केलेला हा उपक्रम यशस्वी झाल्यास, संपूर्ण परिसरात राबवणेचा संयोजकांचा मानस आहे.