पुणे-ससून सर्वोपचार रुग्णालयात महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेत जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. नितीन अभिवंत , प्रमुख पाहुण्या म्हणून ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या परिचर्या अधीक्षक राजश्री कोरके , मनोरुग्ण विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ इवान नेटो , परिचर्या विभागाचे पाठयक्रम समन्वयिका प्रियांका साळवे , सहाय्यक प्राध्यापक सुमित खरे आदी मान्यवर उपस्थित होते .
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेच्या परिचर्या विभागाचा वार्षिक अहवाल सुमित खरे यांनी सादर केला . जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून परिचर्या विभागामार्फत मनोरुग्ण बांधव व संस्थेमधील कर्मचारी यांच्याकरिता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी विजेत्यांचा संस्थेमार्फत मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला .
सन २०१९ करीता नर्सेस थीमचे अनावरण ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या परिचर्या अधीक्षक राजश्री कोरके यांच्याहस्ते करून त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . या कार्यक्रमास मनोरुग्ण , मानसशास्त्र , मनो सामाजिक विभागाचे शिक्षक , विदयार्थी तसेच संस्थेत कार्यरत परिसेविका , अधिपरिचारिका व अन्य कर्मचारी उपस्थित होते .
यावेळी प्रथम वर्षाची एम. एस. सी. नर्सिंगची विद्यार्थिनी रुपम गायकवाड हिने आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली .