पुणे-श्री. हनुमान जन्मोत्सवनिमित्त रास्ता पेठमधील के ई एम रुग्णालयासमोरील श्री उंटाडे मारुती मंदिराच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी शाहू उद्यानाजवळील संत गाडगे महाराज कार्यालयात हा महाप्रसादाचा लाभ चार हजार भाविकांनी घेतला .
यावेळी महापूजा व आरती करण्यात आली . यावेळी श्री उंटाडे मारुती मंदिराचे अध्यक्ष सुदर्शन मुदलियार , विश्वस्त प्रदीप मुदलियार , रमेश मुदलियार , आर. एच. कृष्णन , सिंधुताई कन्हेरकर आदी मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी शंकुतला साळेकर , महेंद्र साळेकर , कृष्णमूर्ती पिल्ले , जितेंद्र ढमाले , प्रा. वाल्मिक जगताप , गणेश आचार्य व माधव नाडकर्णी आदींनी विशेष परिश्रम घेतले .