पुणे-प्रजासत्ताक दिनानिमित्त अखिल मंगळवार पेठ लोकसेवा प्रतिष्ठानच्यावतीने ” संविधान रॅली ” संपन्न झाली . मंगळवार पेठमधील लुम्बिनी बुध्द विहार येथे झालेल्या या कार्य्रक्रमाचे उदघाटक जेष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांच्याहस्ते डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले . या ” संविधान रॅली ” चे आयोजन अखिल मंगळवार पेठ लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय वारभुवन व छाया वारभुवन यांनी केले होते . या कार्य्रक्रमास सदानंद शेट्टी , मुख्तार शेख , संजय बालगुडे , नगरसेविका सुजाता शेट्टी , नगरसेविका पल्लवी जावळे , मनोज पिल्ले , सिध्दार्थ चव्हाण , प्रकाश आवाड , दत्ता पोळ , निलेश आल्हाट , नितीन वाघमारे , नितीन चव्हाण , संजय वारभुवन , बबन कांबळे , सचिन वाघमारे , महानंदा डाळींबे , विकार अहमद शेख , मिलिंद बनसोडे , सुखदेव शिंदे , फय्याज शेख , अमर पवार , दत्तात्रय साबळे , विनय चव्हाण , राजू कांबळे , आनंद रणपिसे , अनिल आवाड , सूरज भालेराव , राजू शिंदे , अविनाश रणसिंग , चिमाजी चव्हाण , शब्बीर शेख , राहुल कांबळे , युसूफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते .
या ” संविधान रॅली ” ची सुरुवात मंगळवार पेठमधील लुम्बिनी बुध्द विहार करण्यात येऊन कडबा कुट्टी वजनकाटा , भीमनगर , कमला नेहरू रुग्णालय , पंधरा ऑगस्ट चौक , नरपतगीर चौक मार्गे जुनी पुणे जिल्हा परिषद मार्गे ससून चौकातून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे समाप्त झाली . यावेळी बौद्धाचार्य नितीन वाघमारे यांनी सामूहिक बुध्द वंदना घेण्यात आली . यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अखिल मंगळवार पेठ लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय वारभुवन व छाया वारभुवन यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजयी असो अशा घोषणा देण्यात आल्या .