पुणे-मांज्यामध्ये अडकलेल्या कावळ्याला मुक्त करून आकाशात उंच भरारी घेऊन सोडून दिले . बंडगार्डन रोडवरील माता रमाई पूर्णाकृती पुतळ्यासमोरील वडाच्या झाडांमधील फाद्यांमध्ये असणाऱ्या मांजामध्ये कावळा अडकला होता . त्या शेजारीच माता रमाई पुतळा येथे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या बैठक चालली होती . त्यावेळी सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष विनोद चव्हाण यांना कावळा मांज्यामध्ये अडकलेला दिसला . तो कावळा मांजामधून सुटका होण्यासाठी प्रयत्न करत होता . परंतु त्याची सुटका त्या मांजामधून होत नव्हती . त्यावेळी कार्यकर्त्यांनी अग्निशमन दलास दूरध्वनी करून कळविले . त्यावेळी जवळच असणाऱ्या लोकनेते दयाराम राजगुरु अग्निशमन दलाचे कर्मचाऱ्यांनी त्या कावळ्या भोवतील मांजा आकड्याने कापून कावळ्याची सुटका केली . यावेळी सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष विनोद चव्हाण , फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड , जॉर्ज जॉन उपस्थित होते .
यावेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी विजय चौरे , चंद्रकांत सोनावळे , सागर ठोंबरे व अनिल म्हस्के आदींनी कावळ्याची सुटका करण्यास मदत केली .