पुणे-नाताळनिमित्त शालोम ख्रिश्चन असोसिएशनच्यावतीने प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखाव्याची रॅली व बेस्ट सॅन्टाक्लॉज स्पर्धाचे आयोजन करण्यात आली होती .या रॅलीतून समाजात शांतता , सदभावना व पर्यावरण जनजागृतेचा संदेश देण्यात येणार आहे .तसेच नो डी. जे. चा संदेश देण्यात आला . तसेच , बेस्ट सॅन्टाक्लॉज स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते .प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखावा हा आपल्या चारचाकी वाहनातून सजावट करून आणून या रॅलीमध्ये स्पर्धक सहभागीझाले होते .
सेंट पॅट्रिक्स चर्च येथील बिशप हाऊस पासून हि रॅली सुरुवात बिशप वेलरीयन डिसोझा , नगरसेविका अश्विनी लांडगे व डॅनियल लांडगे यांच्याहस्ते ध्वज उंचावून करण्यात आले . . तसेच बेस्ट सॅन्टाक्लॉज स्पर्धेमध्ये सर्व धर्मिय बांधव सहभागी झाले होते . तसेच प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखाव्याची स्पर्धा आयोजित करण्यात आलीहोती . यामध्ये पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व चर्चला सहभागीझाले होते . महात्मा गांधी रोडवर येरवडा येथील डॉन बॉस्को शाळा , शंकरशेठ रोडवरील मोलेदिना टेक्निकल हायस्कुल व मुकुंदनगर येथील क्रेसेंट हायस्कुल मधील विद्यार्थी बँड पथक व जनजागृतीचे संदेश देणार आला . वेगेगळ्या चर्चमधील तरुण तरुणी नाताळची गाणी गायली . तसेच दहा वर्षीय लिट्ल ड्रमर वंडर बॉय मल्हार माने हा रॅलीमध्ये ड्रम वाजवून आपली कला सादर केली . या बेस्ट सॅन्टाक्लॉज स्पर्धा व प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखाव्याची स्पर्धा संपन्न झालीं.
हि रॅली , एम्प्रेस गार्डन जवळील सेंट पॅट्रिक्स चर्च येथील बिशप हाऊस पासून , सोलापूर रोड , फातिमानगर , विठ्ठलराव शिवरकर रोड ,जांभुळकर चौक , जगताप चौक , संविधान चौक , रहेजा गार्डन , गंगा सॅटेलाईट , नेताजी नगर , लुल्लानगर चौक , सी टी सी , गोळीबार मैदान चौक , ट्राय लक हॉटेल चौक , कोहिनुर चौक , महात्मा गांधी रोडमार्गे महावीर चौक , अरोरा टॉवर्स चौक , बुटी स्ट्रीट , गवळी वाडा , मॅजेस्टिक हॉटेल , ख्राईस्ट चर्च मार्गे क्वार्टर गेट चौकातील सिटी चर्चमध्ये रॅली समाप्त झाली .
रॅली समाप्तीनंतर क्वार्टर गेट चौकातील सिटी चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखाव्याची रॅली व बेस्ट शांताक्लॉज स्पर्धेचा पारितोषिक वितरण संपन्न झाला . या पारितोषिक वितरण सोहळ्यास प्रमुख पाहणे पुणे धर्मप्रांताचे प्रमुख बिशप थॉमस डाबरे , बाप्पुसाहेब भोसले , विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबराव बाबर ,समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी पोलीस उपनिरीक्षक शशिकांत शेंडगे , फादर मारियानो डिसिल्वा , फादर अरुण त्रिभुवन , रिटा ऍंथोनी , सॅमसन नायडू , इलियास शेख , अझहर शेख , मेघराज पवार , एडवर्ड जेकब आदी मान्यवर उपस्थित होते .
या स्पर्धेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखावामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक घोरपडी येथील सेंट जोसेफ चर्चने पटकाविले . व्दितीय क्रमांकाचे कोंढवा खुर्द येथील अवर लेडी ऑफ लुडस चर्च तर तिसरा क्रमांक घोरपडी येथील सेंट ऍंथोनी चॅपल (जॉली बॉईज ग्रुप) हे विजेते ठरले .
या बेस्ट सॅन्टाक्लॉज स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व्ही व्ही एन फ्रान्सिस तर व्दितीय क्रमांक निकोलस व्हिक्टर राज नयकाम आड विजेते ठरले . विशेष बक्षिसे दहा वर्षीय लिट्ल वंडर ड्रमर बॉय मल्हार माने व हिरन पवार डान्स ग्रुप याना विशेष सन्मान पारितोषिक देण्यात आले .
या रॅलीचे संयोजन पीटर डिक्रूज , शालोम ख्रिश्चन असोसिएशनक्सचे संस्थापक अध्यक्ष ख्रिस्तोपर राजमनी, असोसिएशनचे सदस्य अंजलीस अँथोनी , येसुनंदन दोराईस्वामी , जेम्स दोराईराज , विल्सन डॅनियल , बबलू रॉयल , केविन मॅन्युअल , विनेश पिल्ले , रिबेलो जेकब , रॉकी आरोक्यु स्वामी , ऐरण डिक्रूज , डेव्हिस देवदास , सुशीला जेराड जोसेफ , जानेस फर्नाडिस , रॉकी लोबो , मॉन्टी डेनिस जेकब , अँथोनी पिल्ले , सँडी आथर बरोज, फ्रांसिस अँथोनी व नोएला कांबळी आदीने केले होते .