पुणे -शहर पोलीस व सीरत कमिटी यांच्या सहकार्याने ईद ए मिलादुन्नबी निमित्त शहरात प्रथम सकाळी मिरवणूक ” नो डी जे व लाऊडस्पिकर ” या संकल्पनेने शांततेत काढली . या आवाहनास पोलीस बांधवांचे विशेष सहकार्य लाभल्याबद्दल सीरत कमिटीच्यावतीने पुणे शहर पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांचा शाल व पुष्पगुछ देउन सत्कार करण्यात आला .
यावेळी पुणे शहर सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे , पोलीस उपायुक्त अशोक मोराळे , सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र रसाळ , पोलीस निरीक्षक सर्जेराव बाबर , इस्माईल शेख , सीरत कमिटीचे अध्यक्ष मौलाना गुलाम अहमद खान , सरचिटणीस रफीउद्दीन शेख , सिराज बागवान , असिफ शेख , हाफिज एजाज , वस्ताद आतिक खान , उस्मान तांबोळी , कासम शेख , लुकमान खान , हाजी नदाफ , इसहाक चावीवाले , अहमद सय्यद , अतिक मोमीन , हाफिज इद्रिस , सादिक लूकडे , आयाज शेख , नदीम मुजावर , रेहान शेख , मुख्तार शेख व मेहबूब शेख आदी मान्यवर उपस्थित होते .
यंदाच्या वर्षी सीरत कमिटीच्या आवाहनाला प्रतिसाद देउन अनेक तरुणांनी व मंडळांनी डी जेचा वापर करण्याऐवजी त्यावर होणाऱ्या खर्चातून लहान मुलांना खाऊ वाटप , फळे , पाणी वाटप केले. काही तरुणांनी नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित केली . अल कुरेश यंग सर्कलच्यावतीने बाराशे किलो मोतीचूर लाडूवाटप केले . तसेच सफाई कामगारांना मिठाई वाटप करण्यात आले . आय टी शेख मित्र परिवाराच्यावतीने प्रथमच रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले . डी जे , महागडी सजावट यावर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा लोकपयोगी काम करणे म्हणजेच पैगंबर यांच्या शिकवणुकीचे व संदेशाचे पालन करणे होय , असे सीरत कमिटीचे सदस्य वस्ताद आतिक खान यांनी सांगितले .