पुणे-घोरपडी गाव येथे रेल्वे क्रॉसिंगजवळ वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या एका गरोदर महिलेची डिलिव्हरी डॉकटर विद्या विजय माने यांनी केल्याबद्दल स्वयंम सामाजिक संस्थेच्यावतीने त्यांना पुष्पगुछ देउन स्वयंम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दीप्ती पाटोळे व सामाजिक कार्यकर्ते अजय पाटोळे यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले .
एका गरोदर महिलेला रेल्वे क्रॉसिंग करून दवाखाण्यात जायचे होते . परंतु रेल्वे गेट बंद असल्यामुले त्यांना रिक्षा त्याच ठिकाणी थांबबावी लागली त्यावेळीस त्या महिलेला वेदना सुरु झाल्या . त्यावेळी अचानक देवदुताप्रमाणे डॉकटर विद्या विजय माने या त्या गरोदर महिलेच्या मदतीला धावल्या . त्यांनी त्या महिलेची प्रसूती केली . आणि त्यातून त्या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला . डॉकटर विद्या विजय माने यांच्या मदतीमुळे आईचे व तिच्या बाळाचे प्राण वाचले . त्याच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वयंम सामाजिक संस्थेच्यावतीने सन्मानित करण्यात आले . असे स्वयंम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दीप्ती पाटोळे व सामाजिक कार्यकर्ते अजय पाटोळे यांनी सांगितले .