पुणे-लौंड्री व्यावसायिकांना वीजदरात सवलत जाहीर केल्याबद्दल पुणे जिल्हा लौंड्री व्यावसायिकांच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट व लौंड्री संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी उपमहापौर सुरेश नाशिककर यांच्याहस्ते शाल , श्रीफळ , पुणेरी पगडी घालून स्मृतिचिन्ह देउन भव्य सत्कार करण्यात आला . बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्य्रक्रमास महापौर मुक्ता टिळक , महापालिका सभागृह नेते श्रीनाथ भिमाले , स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक , महाराष्ट्र परिट धोबी महासंघाचे अध्यक्ष देवराज सोनटक्के , परिट आरक्षण समितीचे सचिव अनिल शिंदे , पुणे शहर लौंड्री व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश अभ्यंकर , कार्याध्यक्ष सारंग मसुरकर , महासचिव अमित जाधव , उपाध्यक्ष प्रितम चौधरी , खजिनदार राहुल राक्षे , सहसचिव अनिल मडीवाल आदी मान्यवर व लौंड्री व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले कि , लौंड्री व्यावसायिकांना वीजदरात सवलत देण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती . त्यामध्ये लौंड्री व्यावसायिकांना व्यावसायिक वीज दर भरावा लागत असल्यामुळे कमवायचे किती ? खर्च करायचे किती ? या समस्येना सामोरे जावे लागत होते . त्यासाठी शासनाने ४० टक्के वीज दरात कपात करून सुमारे ४०००० लौंड्री व्यावसायिकांच्या हिताचा ऐतिहासिक निर्णय घेतला . तसेच शासनाने पारंपरिक ऊर्जा स्त्रोत महत्व देण्यासाठी प्रयत्न करीत आहे . कोळशापासून तयार होणाऱ्या ऊर्जेपेक्षा पारंपारिक ऊर्जा स्त्रोताला महत्व दिले आहे . त्यासाठी लौंड्री व्यावसायिकांनी आपल्या व्यावसायिकाच्या ठिकाणी सौर पॅनेल लावून वीज निर्मिती करावी, त्यासाठी शासन सर्व सहकार्य केले . असे सौर ऊर्जा प्रकल्प राबविणाऱ्या लौंड्री व्यावसायिकांना २५ टक्के सवलत देण्याचा शासन लवकरच शासकीय अध्यादेश काढणार असल्याचे त्यांनी सांगितले . याचा फायदा देखील सुमारे ४०००० लौंड्री व्यावसायिकांना होणार आहे . समाजाला आरक्षण मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालू आहेत . असे त्यांनी सांगितले .
यावेळी महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले कि , लोकप्रतिनिधी म्हणू काम करताना समाजाचे प्रश्न सोडविता आले पाहिजे . त्या दृष्टीकोनातून आज हा लौंड्री व्यावसायिकांना वीजदरात सवलत देण्याचा शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला. सरकारने जनतेची कामे केली पाहिजेत . लोकप्रतिनिधींनी देखील जनतेचे प्रश्न सोडविले पाहिजेत . आमचे सरकार काम करत असल्यामुळे पुढचे सरकार देखील आमचेच येणार असल्याचे त्यांनी सांगितले .
या कार्यक्रमाचे प्रास्तविक पुणे शहर लौंड्री व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश अभ्यंकर यांनी केले तर सूत्रसंचालन अमित जाधव यांनी केले तर आभार सुनिल पवार यांनी मानले .