पुणे- शहर मातंग समाज समिती व दलित संघटनाच्यावतीने बंडगार्डन रोडवरील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एक दिवसीय ” लाक्षणिक धरणे आंदोलन ” करण्यात आले . शिरूर येथील पूजा सकट व सातारा येथील अमरावती सखाराम चव्हाण यांना एल अँड टी कंपनीच्या लोकांनी पेट्रोल टाकून जाळून मारून टाकण्यात आले . यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून मूळ गुहेगारांना अटक करून कडक कारवाई करण्यासाठी हे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले . मातंग समाजातील जेष्ठ नेते अंकल सोनवणे यांच्या नेर्तृत्वाखाली हे एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले .
या उपोषणामध्ये विभागीय उपायुक्त याना पुणे शहर मातंग समाज समिती व दलित संघटनेच्या शिष्टमंडळाने निवेदन देण्यात आले . यावेळी मयत अमरावती सखाराम चव्हाण यांचे पुत्र बाप्पू चव्हाण हे निवेदन देताना उपस्थित होते .
या लाक्षणिक उपोषणात पुणे शहर मातंग समाजचे सचिव प्रकाश वैराळ ,रिपब्लिकन संघर्ष दलाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय भिमाले , पुणे शहर अध्यक्ष नितीन बालकी, दलित युवक आंदोलनाचे सचिन बगाडे , भारतीय दलित विकास आघाडीचे रवी आरडे , दलित युवक संघर्ष समितीचे अध्यक्ष सुधीर नेटके , रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे , लहुजी समता परिषदेचे अध्यक्ष अनिल हातागळे , भीम आर्मीचे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष दत्ता बालकी पोळ , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आर पी आय )चे अध्यक्ष सुहास गजरमल , आल्वासा फाऊंडेशनचे अध्यक्ष दता जाधव , भारिप बहुजन महासंघाचे नागेश भोसले , रिपब्लिकन युवा मोर्चाचे अश्विन दोडके , भारिप सदस्य धनंजय सोनवणे , विनोद साळवे , लहुजी छावा संघटना शाम देडे , लहुजी संघर्ष सेनेचे दत्ता कांबळे , कामगार नेते सुहास बनसोडे , रिपब्लिकन मातंग सेनेचे अध्यक्ष अमोल तुजारे ,क्रांतिगुरू लहुजी महासंघाचे संतोष घोलप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .