अखिल भारतीय नाट्य परिषद ४१वा वर्धापनदिनानिमित्त कलावंतांचा सत्कार सोहळा
पुणे – अखिल भारतीय नाट्य परिषदेचा यंदा ४१ वा वार्धपानदिन सोहळा उल्हास पवार ( माजी आमदार )अभिनेत्री वर्षा उसगावकर,मेघराज भोसले (अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व अखिल भारतीय नाट्य परिषद पुणे शहर ) यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होत आहे येत्या शनिवारी २५ मे २०१९ रोजी सायंकाळी ४:३० वा बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे.
नाट्यक्षेत्रात उत्तम अभिनय ,उत्तम दिग्दर्शन ,विनोदी कलाकार ,संगीतकार ,उत्कृष्ट नाट्य निमिर्ती ,पडद्यामागील कलाकार यांचा सन्मान होणार आहे या कार्यक्रमाला सहभागी रंगकर्मी कलाकार प्रवीण तरडे ,आस्ताद काळे ,सौरभ गोखले , शशांक केतकर , चेतन चावडा , आशुतोष वाडेकर ,जमील शेख ,विजय मिश्रा ,केतन क्षीरसागर , सुशांत शेलार , सिद्धेश्वर झाडबुके ,सक्षम कुलकर्णी ,केतन गोडबोले , संस्कृती बालगुडे , मधुरा देशपांडे ,शाश्वती पिंपळेकर ,अश्विनी कुलकर्णी संजीव मेहेंदळे ,कविता टिळेकर ,हेमांगी कवी आणि नैना आपटे आणि इतर क्षेत्रातील अनेक कलाकार ,मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे संकलन दिग्दर्शन विनोद खेडकर -विजय पटवर्धन ,निवेदन लेखन संजय डोळे,नृत्य दिग्दर्शन अश्विनी कुलकर्णी ,बहुरंगी मनोरंजन ,नाटक ,नाट्यगीते ,नाट्यपदे , प्रहसन इत्यादी या कार्यक्रमांमध्ये होणार आहे.
– सत्कारार्थीची नावे पुढीलप्रमाणे
उत्कृष्ट अभिनय – पुरुष –राज्यनाट्य स्पर्धा – विशाल इंगळे
उत्कृष्ट अभिनय – स्त्री राज्यनाट्य स्पर्धा -सुचित्रा गिरीधर
उत्कृष्ट दिग्दर्शन राज्यनाट्य स्पर्धा – अभयसिंह जाधव
उत्कृष्ट नाट्यनिर्मिर्ती राज्यनाट्य स्पर्धा –निर्माण -पुणे
मनोरम नातू पुरोस्कृत नाट्यलेखन – डॉ . विवेक बेळे
उत्कृष्ट व्यावसायिक दिग्दर्शन कै. पार्श्वनाथ आळतेकर स्मृती पारितोषिक – हेमंत एदलाबादकर
नाटक समिक्ष पुरस्कार गो. रा. जोशी स्मृती पुरस्कार – नम्रता फडणीस
पडद्यामागील पुरस्कार
छोटा गंधर्व पुरस्कार – अरुण दत्त
दिगवंत कलाकारांच्या पत्नीस
कै. रमाबाई गडकरी स्मृती पुरस्कार -सायली बेंद्रे
उदयोन्मुक संगीत कलाकार
वसंतराव देशपांडे स्मृती पुरस्कार -लीलाधर चक्रदेव
पुणे परिषद शाखा कार्यकर्ता -शेखर ढेने ( तात्या )
कै. गंगाधरवंत लोंढे पुरस्कार -राजेंद्र अलमखाने
रंगभूमी व चित्रपट विनोदी कलाकार
वसंत शिंदे पुरस्कार – चेतन चावडा
कै .सुनील ताटे पुरस्कार – सौरभ गोखले
लोकनाट्य विनोदी कलावंत
रामनगरकर स्मृती पुरस्कार -शंकर जाधव
महान नैपत्यकार
पु . श्री. काळे स्मृती पुरस्कार -विठ्ठल हुलावळे
उत्कृष्ट गद्यनट
नटवर्य केशवराव दाते पुरस्कार – प्रदीप पटवर्धन
संगीत क्षेत्रातील दीर्घकालीन सेवा
कै. माणिक वर्मा पुरस्कार – मधुवंती दांडेकर
अखंड नाट्यसेवा
कै. बबनराव गोखले पुरस्कार – राजश्री आठवले
रंगभूमीवरील प्रदीर्घ सेवा
कै. भार्गवराव आचरेकर स्मृती पुरस्कार -दीप्ती भोगले
रंगभूमीवरील लक्षणीय अभिनय
कै. यशवंत दत्त पुरस्कार -आस्ताद काळे
कै. मधू कडू पुरस्कार – महेंद्र चव्हाण
कै. मधुकर टिल्लू पुरस्कार – मंजिरी धामणकर
कै. अरुणभट स्मृती
जीवन स्पर्श – विजय पटवर्धन
पारंपरिक लोककला
यमुनाबाई वाईकर पुरस्कार – शकुंतल नगरकर