अंकीत फडिया यांचें ‘द कसिनो जॉब’ प्रकाशित
हॅकिंग थीमवर आधारित भारतातील पहिले पुस्तक
पुणे– सर्वाधिक विक्रीचा विक्रम असणारे लेखक अंकित फाडिया एथिकल हॅकिंगवर आधारित पुस्तके लिहण्यासाठी प्रसिद्ध आहेत, आणि आता एथिकल हॅकिंगमधुन बाहेर निघत त्यांनी आपली पहिली कल्पनारम्य कादंबरी द कसिनो जॉब लॉंंच केली आहे.
‘द कसिनो जॉब’ तीन जिवलग मित्रांची कथा आहे. रोहन, हार्दिक आणि मल्लिका हे तीघे गोव्यात जातात आणि तेथे भरपूर मजा करतात. एक संध्याकाळी गोव्यामधील एल डॉराडो कसिनो जहाजावरील एक टेबलवर ते तीन पत्ती खेळत आसतात, तेंव्हा अचानक त्यांचा हा खेळ उंदीर-मांजरामधील खुनी खेळात बदलतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ते पाहतात की ते निर्जन समुद्र किनार्यावर पोहचलेले अाहेत, त्यांनी सगळे पैसे गमावले आहेत आणि ते धोकादायक इस्रायली माफियांच्या निशाण्यावर आहेत. ही कथा या तीन मित्रांवर आधारित आहे. फसवणूक, दगा, छळाच्या वादळामध्ये अडकलेले हे तीन मित्र त्या परिस्थितीतून कसे बाहेर येतात ह्यावर ही कहानी आधारित आहे.
पुण्यातील क्रॉसवर्ड औंध, मध्ये ह्या प्रकाशनाच्या दरम्यान आपले विचार व्यक्त करताना अंकीत फाडिया म्हणाले कि, वयाच्या १४ व्या वर्षी मी माझे पहिले पुस्तक लिहिले होते. एक कल्पनारम्य कादंबरी लिहने माझे स्वप्न होते. जसे की ह्या कथेच्या सारांशामध्येच समजते की द कैसीन जॉबचे मुख्य पात्र एक हैकर आहे जे फावल्या वेळेत गंमत म्हणून कंप्यूटर आणि वेबसाइट हॅक करते. हॅकिंग ह्या कथेचा मुख्य मुद्दा आहे. याचबरोबर आजच्या महाविद्यालयीन मित्रांच्या आयुष्यावर देखील हे पुस्तक प्रकाश टाकते.
‘द कसिनो जॉब’ लिहण्याची प्रेरणा मला तेंव्हा मिळाली जेंव्हा मी माझ्या मित्रांबरोबर गोव्यास गेले होतो. जेंव्हा आम्ही तिथे कसिनोमध्ये गेलो तेंव्हा आम्ही आश्चर्यचकित झालो की लोक खुप सारे पैसे जुगारीमध्ये घालवतात. त्यावेळी मला जाणवले की जिथे जास्त पैसा तिथे तितक्याच गुन्हेगारी घटनांना वाव मिळतो.
द कॅसिनो जॉब वेस्टलॅंड बुक्स (अमेझॅन) द्वारे प्रकाशित केले असुन त्याची किंमत २९९ रुपए आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ऑनलाइनसह भारतातील सर्व प्रमुख बुक स्टोअरमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे.