पुणे, : भारतात कॅजूअल डायनिंग विभागात मोडणाऱ्या रेस्टॉरंट॒स मध्ये बर्बिक्यू नेशन अग्रगण्य आहे. ३१ जानेवारी ते १८ फेब्रुवारी ह्या काळात ‘ज्वेल्स ऑफ दि सी’ हे सी फूड फेस्टिवल पुणेकर खवय्यांसाठी खास आयोजित करण्यात आले आहे. डेक्कन, पिंपरी, चिंचवड, वाकड, कल्याणी नगर आणि अमनोरा येथील सर्व शाखांमध्ये पुणेकरांना उत्तमोत्तम सी फूडची मेजवानी मिळणार आहे.
विविध अरोमॅटिक मसाल्यांनी बनविलेली लाल, झणझणीत अंगारा कोळंबी त्याचबरोबर फ्राइड कलमरी विथ क्रिमी गेर्कीन सॉस खास पदार्थांपैकी एक असणार आहे. स्मोकी स्वादाचे तंदुरी खेकडे ही खेकडेप्रेमींसाठी खास आकर्षण असून हे विशेष स्टार्टर॒सपैकी एक आहे. मास्यांशिवाय सी फूड अपूर्णच त्यामुळे क्रिस्पी फ्राइड मांदेली फिश आणि ग्रीन चेर्मुला फिश हे न चुकविण्यासारखे आहे. शाकाहारींना अनोख्या मसाल्यांनी बनविलेले व सर्वोत्तम असे पहाडी मश्रूम चाखायला मिळणार आहे. गोड, तिखट क्रिमी पनीर असलेल्या अंजिरी पनीर हे स्टार्टर शाकाहारींकरिता मस्ट ट्राय पैकी एक असेल.
सी फूड, मिठाई, एक्झोटिक वेजिटेबल्स आणि सलाद ह्यांचे विविध लाइव्ह काउंटर राहणार असून अशा विविध पर्यायांपैकी निवडण्याची संधी खवय्यांना मिळणार आहे. पीनट होसिन सॉस, पाच स्पाइस आंबा सॉस, मस्टड सॉस आणि शझुआन सॉस ह्यांपैकी तुमच्या पसंतीचे सॉस निवडून टोफू, वॉटर चेस्टनट, पनीर आणि सोया चापचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकता. इंडियन सॅल्मन, स्क्विड, टुना आणि पॅम्ब्रेट मांसाहारींसाठी आहे.
ज्वेल्स ऑफ दि सी हे फक्त खाण्यापुरते मर्यादित नसून, प्रत्येक शाखेचा साजेसा अम्बियंस आणि डेकोरेशन असून तशी वातावरण निर्मिती करण्याचा बर्बिक्यू नेशनचा प्रयत्न आहे. काही स्टाफ नाविक म्हणून, वेटर्स फ्लोरल प्रिंटेड कपडे परिधान करून तर लाइव काऊंटरवरील शेफ पारंपारिक कोळी मासेमाराच्या वेशभूषेत असतील.
फूड फेस्टिवल आम्हाला ओवरबोर्ड जाण्याची संधी देते व बर्बिक्युचे सी फूड फेस्टिवल तर न चुक्विण्यासारखे असते असे मत श्री समीर भसीन – मुख्य कार्यकारी अधिकारी, बारबेक्यू नेशन हॉस्पिटॅलिटी लि.यांनी व्यक्त केले. मुंबई हे विविध खाद्यसंस्कृतीचे माहेरघर असून आम्हाला ते आमच्या पद्धतीने प्रदर्शित करता येत असल्याचा आम्हाला आत्यंतिक आनंद आहे.