यूसीमास, पुणे तर्फे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन – १५२० हून अधिक विद्यार्थींचा सहभाग
पुणे- विभागातील युनिव्हर्सल कन्सेप्ट मेंटल अरथमॅटिक सिस्टम (यूसीमास) तर्फे राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, अंकगणिताची ही स्पर्धा बालेवाडी येथे नुकतीच संप्पन झाली. ह्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रतील ८२ केंद्रामधील १५२० विद्यार्थी ह्यामध्ये सहभागी झाले होते. ह्यामध्ये लहान मुले गणितातील कठीण अश्या २०० समस्या (सम्स) आठ मिनटांत सोडवू शकतात, जी ते कॅल्क्युलेटरपेक्षा जास्त वेगाने करतात.
ह्यावेळी पुण्यातील जवळपास १००० लहान मुले आपल्या पालकांबरोबर या स्पर्धेसाठी उपस्थित होती. ज्यामध्ये बिशप्स, सेंट विंन्सट्स, व्ही.के.पाटील, दस्तूर, पोतदार इंटरनॅशनल आदि शाळांचा समावेश होता.
या प्रतियोगीतेचा उद्देश फक्त अंकगणितच नाही तर हा एक संपूर्ण-मस्तिष्क विकास कार्यक्रम आहे.यूसीमासच्या संचालक रश्मी इंदुलकर म्हणाल्या कि, येथे शाळा, अभ्यासक्रम आणि शिकवण पूरक मुलांमध्ये स्पर्धात्मक भावना विकसित केली जाते आणि त्यांना उत्कृष्ट कामगिरी करण्यास प्रवृत्त कले जाते.यावर्षीच्या कार्यक्रमात अद्भुत ‘फ्लॅश कॉम्पिटिटिशन’ होती. ज्यामध्ये मुले संख्या पाहून जलद उत्तरे, गणना करत होती आणि त्यांना कागदावर लिहत होती.
विमान नगर केंद्राचे प्रमुख बिन्सी थॉमस म्हणाले की केंद्रामध्ये स्पर्धेची तयारी एक महिना अगोदरच सुरू होती आणि विद्यार्थी ह्यामध्ये नित्य-नियमापेक्षा जास्त वेळ देत होते. पुढे ते म्हणाले कि, दैनिक अभ्यास केला तर मुले उच्च कौशल्य पातळी गाठतात, त्यांची गती आणि अचूकता वाढते आणि शालेय शिक्षणात मुलांची कामगिरी देखील तीव्रपणे सुधरते.
शालेय गटांतील प्रथम तीन विजेते होते वि.खे पाटील, हचिंग्स, सेंट.मेरिअर्स. पीएमसी आयुक्त कुणाल कुमार ह्यावेळी पालकांच्या रूपात उपस्थित होते ह्यावेळी त्यांनी मुले आणि पालकांंना संबोधित केले होते. इतर मान्यवरांमध्ये के.व्ही देहू रोडचे प्रिन्सिपल मिश्रा, चॅलेंजर्स स्कूलचे प्राचार्य गडकरी, पी.के इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक काटे उपस्थित होते.