जुन्नर येथे एटीएम फोडण्याच्या अयशस्वी प्रयत्न ,दरोड्याच्या प्रयत्नातील एकूण 7 आरोपींना अटक,
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर शहरात हिताची कंपनीचे एटीएम फोडण्याच्या प दरोडे खोरांना प्रयत्न फसला.तर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एटीएम फोडणाऱ्या टोळीतील 7 जनांना अटक करण्यात आली.जुन्नर पोलिसांच्या या कारवाईत अटक आरोपीकडील हत्यारे तसेच दुचाकी वाहन जप्त करण्यात आले असुन पोलीसांच्या या धाडसी कारवाईचे कौतुक होत आहे.पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांनी ही माहिती दिली.जुन्नर शहराचे प्रवेशद्वाराजवळ हिताची कंपनीचे एटीएम आहे.मंगळवारी रात्री जुन्नर पोलीस ठाण्यात एका नागरिकाने सतर्कता दाखवीत सदर एटीएम फोडण्याचा अज्ञात चोरटे प्रयत्न करत असल्याची माहिती फोनवरून दिली.जुन्नर पोलिसांचे पथक तातडीने याठिकाणी जाऊन पोहचले असता त्या ठिकाणी एटीएम बाहेर दोन जन अंधारात उभे होते तर एकजण एटीएम बाहेर गुप्ती घेऊन उभा होता.पोलिसांनी हटकले असता एटीएम मधुन पाच जण बाहेर पडले.हे पाच जण एटीएम मध्ये लोखंडी गजांच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत होते.पोलिसांनी यातील दोघांना पकडले तर पाच जण पळून जाण्याचा यशस्वी झाले.यातील तिघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले.ज्ञानेश्वर वारखेडे,भीम भोईर ,योगेश लिहे रहाणार वेळे तालुका मुरबाड,रेहान उर्फ बच्चू हसन सय्यद रा जुन्नर,संकेत गायकवाड,रहाणार जुन्नर,कांताराम महाबरे,युवराज साळवे रा जुन्नर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार जुन्नर येथील कां ताराम महाबरे,युवराज साबळे यांनी इतर आरोपींना फोन करून जुन्नर येथे एक काम वाजवायचे आहे असे सांगुन बोलावून घेतले होते.सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद साबळे,पोलीस हवालदार मुकुंद मोरे ,राजेंद्र बुरुड,भरत सुर्यवंशी ,प्रशांत पवार,सुनील काटे,संदीप लोहकरे गणेश जोरी,या कर्मचाऱ्यांनी दरोडे खोरांना रंगेहाथ पकडले असून फरारी आरोपींचा शोध सुरू आहे.पोलीस निरीक्षक युवराज मोहिते करत आहेत.