देवळे शाळेतील शिक्षिका स्काऊट मेळाव्यासाठी जाणार अमेरिकेला
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर तालुक्यातील आदीवासी भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळे या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता सुनील कुऱ्हाडे मॅडम यांची उत्तर अमेरिका येथे होणाऱ्या चोविसाव्या जागतिक स्काऊट जांबोरी मेळाव्यासाठी निवड झाली आहे.
15 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत अमेरिकेतील ग्लेन जैन वेस्ट व्हर्जिनिया येथे स्काऊट मेळावा होणार आहे.स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांनी ही चळवळ सुरू केली आहे.दर चार वर्षांनी विविध देशात जागतिक जांबोरी चे आयोजन करण्यात येत असते.
अनलॉक न्यू वर्ल्ड बंधनमुक्त नवीन जग हे या मेळाव्याचे ब्रीद वाक्य आहे जगातील विविध देशाचे 40,000 स्काऊट प्रतिनिधी एकत्र येऊन आपल्या देशातील संस्कृती,जागतिक वारसा,रूढी परंपरा चालीरीती यांचे एकत्रित देवाण-घेवाण करून अभ्यास करत असतात, आणि कुऱ्हाडे हे या अगोदर जांबोरी साठी लंडन या ठिकाणी गेल्या होत्या कुऱ्हाडे राष्ट्रीय एकात्मता सर्वधर्मसहिष्णुता वाढीस लागण्यास मदत करणार आहेत.
तसेच साहसी खेळ सांस्कृतिक कार्यक्रम यात सहभागी होऊन विविध देशाचे देशातील संस्कृतीचा अभ्यास करणार आहेत.शाळेच्या वतीने कुऱ्हाडे मॅडम यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
आदिवासी दुर्गम भागातील एक शिक्षिका स्काऊट गाईड साठी उत्तर अमेरिकेत जाते. हे गावासाठी आणि शाळेसाठी भूषणावह बाब आहे. म्हणून शाळेच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने कुऱ्हाडे मॅडम यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री चिमाजी भोजने बाळासाहेब लांघी सर सुवर्णा ढोबळे ,मॅडम मनीषा कवडे मॅडम, रमेश वायडे सर, आणि केंद्रप्रमुख विठ्ठल सांगडे साहेब उपस्थित होते.