जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल शाळेने पारंपारिक पद्धतीने केले नवागतांचे स्वागत
जुन्नर /आनंद कांबळे
आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या उच्छिल शाळेत ,नवीन शैक्षणिक शाळेतील पहिला दिवस कायम बालचमुंच्या स्मरणात रहावा यानिमित्ताने आज शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून पारंपरिक वाद्यवृंद ढोलताशाने प्रभात फेरी चे आयोजन करण्यात आले.नवीन मुलांची वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली.
शाळेतील पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत करण्यात आले.प्रभात फेरी नंतर मुलांसाठी शाळेमध्ये प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले.
शाळेतील सर्व मुलं मोठ्या उत्साहाने या प्रवेश उत्सवामध्ये सहभागी झाली. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय भालेराव , जगदिशशेठ नवले,रोहिदास नवले , गावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भगवानबाबा नवले.रघुनाथ बगाड.गणपत भालेराव,निलेशशेठ नवले व सर्व सदस्य उपस्थित होते.
महिला सदस्य नूतन साबळे व विमल करवंदे आणि ग्रामस्थ पालक मोठ्या उत्साहाने या प्रवेश उत्सवांमध्ये सहभागी झाले व सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषद शाळेची शाळेची पटसंख्या कशी वाढेल व पश्चिम भागात असलेल्या आपल्या शाळेची गुणवत्ता व मागील शैक्षणिक वर्षात शाळेनी केलेली उल्लेखनीय कामगिरी याबद्दल ग्रामस्थांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले .शाळा प्रवेशोत्सवासाठी 100%विद्यार्थी दाखल झाले व सर्वांनी खूपच मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अन्वर सय्यद यांनी सर्वांचे आभार मानले.
प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे नियोजन महिला शिक्षक सौ. स्मिता ढोबळे,सौ.आरती मोहरे आणि श्रीम. लिलावती भवारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.सुभाष मोहरे यांनी सूत्रसंचालन केले.