आवटे विद्यामंदिरच्या अकरा विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर येथील अण्णासाहेब आवटे विद्यामंदिरच्या अकरा विद्यार्थ्यांनी राष्ट्रीयस्तरावरील एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असल्याची माहिती मुख्याध्यापीका जे.एस. हेंद्रे यांनी दिली. या परीक्षेत शिष्यवृत्तीस पात्र असणाऱ्या विद्यर्थ्याना सलग चार वर्षे वार्षिक बारा हजार रुपये प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती मिळणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना बाह्य परीक्षा विभाग प्रमुख प्रविण ताजणे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
शिष्यवृतीस पात्र असणाऱ्या प्रतीक्षा उतळे, आकाश लांडे, आविष्कार साबळे, निखील लांडे, ओम लांडे, ओमकार शेळकंदे, रिकी असवले, साहिल लांघी, सम्यक गायकवाड,सुरज काठे, सुरज दिघे या विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. विलास चव्हाण, उपाध्यक्ष अविनाश पुंडे, देवेंद्र खिलारी, सेक्रेटरी व्ही.डी. पानसरे, सहसेक्रेटरी निलेश गुंजाळ, खजिनदार सुनील ढोबळे, उल्हास नवले, बाजीराव मानकर, ज्ञानेश्वर कबाडी, तसेच सर्व संचालक मंडळ तसेच शिक्षक आणि पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.