‘सोशल आंत्रप्रुनरशिप ‘विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत ७५ संशोधन निबंध सादर
पुणे :
जे. जे. टी. युनिव्हर्सिटी आणि ‘महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च ‘ यांच्या वतीने पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच पार पडली . ‘
‘ ग्लोबल ट्रान्सफॉर्मेशन थ्रू सोशल आंत्रप्रुनरशिप ‘ या विषयावरील संशोधन परिषदेत ७५ शोध निबंध सादर करण्यात आले. जे .जे.टी . युनिव्हर्सिटी चे कुलपती डॉ . विनोद टिबरेवाला , महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च ‘ चे डॉ . डी . हेनरी ,एल एम दाणी ,डॉ . पी .शेखर ,डॉ . एम . सी . शिरहट्टी यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन झाले . ‘संचेतना ‘ या जर्नल चे प्रकाशन करण्यात आले . डॉ . राखी केळसकर यांनी आभार मानले
‘ नाहीरे वर्ग’ आणि ‘आहेरे वर्ग ‘ यातील दरी भरून काढण्यासाठी सोशल आंत्रप्रुनरशिप (सामाजिक उद्योजकता ) चा उपयोग करावा ‘ असे आवाहन डॉ . विनोद टिब्रेवाला यांनी यावेळी बोलताना केले .