पुणे : “माणूस हा समाजाचा मूलभूत घटक आहे. आपल्या परीने स्वतःची प्रगती करण्याचा त्याचा प्रयत्न सुरु असतो. मात्र, स्पर्धेच्या युगात टिकून राहायचे असेल आणि स्वतःसह सामाजिक प्रगतीमध्ये वाटेकरी व्हायचे असेल, तर आपण करत असलेल्या कामाला संस्थात्मक स्वरूप देणे गरजेचे आहे. त्यातून एकमेकांच्या प्रगतीत भर घालण्याबरोबरच समस्या सोडविण्यास मदत होते,” असे प्रतिपादन गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी केले.
फत्तेचंद रांका म्हणाले, “काही वर्षापासून पुण्यात जुन्या गाड्यांचा व्यवसाय पिढ्यानपिढ्या लोक करत आहेत. परंतु त्यांची असोसिएशनची नव्हती. व्यवसाय करताना अडचण आली, तर ती सोडविण्यात असोसिएशन महत्वाची ठरते. सन्मानाने व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करते. असोसिएशनच्या माध्यमातून या विक्रेत्यांच्या कल्याणासाठी काम होईल. एखाद्या व्यापाऱ्यावर संकट आले तर सर्वांनी मिळून त्यांना मदत करणे गरजेचे आहे. तसे झाले, तर असोसिएशनचे महत्व अधोरेखित होईल. असोसिएशनची मजबूत असेल, तर तुमचे कोणीही नुकसान करू शकणार नाही. सदस्यत्वावेळी पूर्ण माहिती घ्यायला हवी.”
सुभाष सणस म्हणाले, “आज प्रत्येकाला कार घेण्याचे स्वप्न असते. या माध्यमातून ते पूर्ण होऊ शकते. असोसिएशनमार्फत डिलर्सना ‘ऑटोकट्टा’ हे ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध झाल्याने फायदा होईल. अधिकाधिक विक्रेत्यांनी असोसिएशनशी स्वतःला जोडून घ्यावे.” विनोद अहिर यांनी प्रास्ताविक केले व असोसिएशनच्या स्थापनेमागील भूमिका सांगितली. सायमा शेख यांनी सूत्रसंचालन केले. निलेश भागवत यांनी आभार मानले.