शिवाजी महाराज, बाजीराव पेशवा यांच्याकडून नेतृत्वगुण शिकावेत : शिवप्रसाद मंत्री
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज हे विश्वात एकमेव राजे आहेत, ज्यांना जनतेने श्रीमंतयोगी आणि जाणता राजा बिरुदे दिली. शिवाजी महाराजांना अवतार आणि परमेश्वर असेही संबोधले जाते. कारण त्यांनी जनतेचे प्रतिनिधित्व केले आणि जनतेला पारतंत्र्यातून मुक्त केले. श्रीमंत बाजीराव पेशवा हेही छत्रपतींप्रमाणे जनतेसाठी लढणारे राजे होते, “असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक शिवप्रसाद मंत्री यांनी केले.
बाणेर रस्त्यावरील यशदा येथे आयोजित पुणे इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्यावरील पुस्तकाच्या प्रकाशनावेळी बोलत होते. यावेळी विश्वकर्मा पब्लिकेशनचे अध्यक्ष राजकुमार अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, श्री. मा. भावे, संदीप तापकीर आदी उपस्थित होते.
शिवप्रसाद मंत्री म्हणाले, “छत्रपतींसारखा राजा आपल्याला लाभला हे आपले भाग्य आहे. त्यांचे मावळे अजूनही जिवंत आहेत. चरित्रवान राजा असल्यामुळे त्यांचे त्यांच्या कार्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न सर्वजण करतात. परंतु आजची पिढी फक्त त्यांचा उत्सव साजरा करतात आणि त्यांचे कार्यावर चालत नाहीत. शिवाजी महाराजांवर अनेक पुस्तके आले. परंतु हे पुस्तक तुम्हाला त्यांचा वेगळा परिचय करून देईल. शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवा यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. शिवाजी महाराज, बाजीराव पेशवा वाचला तर आपल्यातील नेतृत्वगुण विकसित होतील.”
विशाल सोनी म्हणाले, “गुरुमुळे पुस्तक प्रकाशनपर्यंतचा प्रवास करू शकलो आज विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित करत आहोत. देशातली एकमेव प्रकाशन संस्था आहे, जी १९ राज्यामध्ये आणि ८२ शहरामध्ये पुस्तक प्रकाशित करत आहे. तसेच ही सर्व पुस्तके ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहेत.” सूत्रसंचालन मधुरा गुळवणी यांनी केले