‘टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियम’चे पुरस्कार जाहीर
के. व्यंकटेशम, डॉ. अजय चंदनवाले, गिरीजा ओक, राजेंद्र जगताप, डॉ. पंकज जिंदाल,
डॉ. शैलेश पालेकर आदी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते होणार सन्मानित
पुणे : टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियमतर्फे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदा पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, प्राप्तिकर आयुक्त आदर्शकुमार मोदी यांना प्रशासकीय सेवा, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले व हॅन्ड सर्जन डॉ. पंकज जिंदाल यांना आरोग्यसेवा, द लीला ग्रुपचे मोहित अगरवाल व नोवाटेल हॉटेलचे नितीन पाठक यांना उद्योग, संजीवनी मुजुमदार यांना शिक्षण, विजय मित्तल यांना समाजसेवा, डॉ. शैलेश पालेकर यांना रोटरी सेवा, अभिनेत्री गिरीजा ओक यांना अभिनय आणि साहिब दिलबाग सिंग यांना सराफा व्यवसायातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरविण्यात येणार आहे. जानकी मल्होत्रा आणि नीलम पाटील यांचा विशेष सत्कार यावेळी केला जाणार आहे.
त्रिपुरा व बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या शुभहस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. रविवार, दि. २८ ऑक्टोबर २०१८ रोजी दुपारी ४.०० वाजता विमाननगर येथील हॉटेल नोवाटेलमध्ये शानदार सोहळ्यात हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. याप्रसंगी बाहरी बी. आर. मल्होत्रा,
सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्यासह लष्करप्रमुख, एएफएमसी, एनडीएचे कमांडर, पुणे व पिंपरीचे महापालिका आयुक्त, आयकर विभागाचे आयुक्त जिल्हाधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती टीएमसीचे सचिव डॉ. जयसिंग पाटील यांनी दिली आहे.