‘सीएफओ-सीईओ मीट’चे आयोजन
पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) कमिटी फॉर मेम्बर्स इन इंडस्ट्रीच्या (सीएमआय) वतीने ‘सीएफओ-सीईओ इंटरॅक्टिव्ह मीट’चे आयोजन केले आहे. ही परिषद येत्या शुक्रवारी (दि. ३० ऑगस्ट २०१९) सायंकाळी ७.०० वाजता पुणे स्टेशन जवळील हॉटेल शेरटॉन ग्रँड येथे होणार आहे. या परिषदेत उद्योग क्षेत्रातील मुख्य वित्तीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती आयसीएआय’ पुणेचे उपाध्यक्ष सीए अभिषेक धामणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सीए अभिषेक धामणे म्हणाले, “ऑगस्ट महिना ‘मेंबर इन इंडस्ट्री मंथ’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. विविध उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या सदस्यांशी संपर्क साधणे आणि संबध वाढविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात एचडीएफसी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्ष श्री. केकी मिस्त्री यांचे ‘सीएफओ व सीईओचीची सद्यस्थितीतील भूमिका’ या विषयावर बीजभाषण होणार आहे. यांनतर कार्यक्रमात होणाऱ्या चर्चासत्रात सीए अनिल भांडारी, सीए दिलीप आपटे, सीए अनिल पटवर्धन, कोटक बँकेचे अ-कार्यकारी अध्यक्ष प्रकाश आपटे, सीए एस बी झावरे मार्गदर्शन करणार आहेत. पुण्यातील नामांकित सीईओ / सीएफओ, नॉन-चार्टर्ड अकाउंटंट सीएफओ / सीईओंनादेखील आमंत्रित करण्यात आले आहे.”