महात्मा फुले राष्ट्रीय पुरस्कार कृपाल पलुसकर यांना प्रदान
पुणे : नवी दिल्ली येथील माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम कला संस्कृती तथा साहित्य अकादमीतर्फे दिला जाणारा महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय पुरस्कार पुण्यातील के. पी. पॅरामेडीकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक कृपाल पलुसकर यांना नुकताच प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल देण्यात येणारा हा पुरस्कार लोकसभेच्या माजी अध्यक्ष श्रीमती मीराकुमार यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे उपस्थित होते.