गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना ‘सूर्यदत्ता’ संस्थेतर्फे मिळणार शिष्यवृत्ती
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात सूर्यदत्ता कनिष्ठ महाविद्यालय आणि सूर्यदत्ता पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. सूर्यदत्ता ज्युनिअर कॉलेजमधील विज्ञान शाखेत प्रणव संजय मरळ (९०.१०%), कला शाखेत आर्शिया अजय आतकर (९०.६०%), तर वाणिज्य शाखेत अनुष्का महेश उकिडवे (८७%) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. सूर्यदत्ता पब्लिक स्कुलमधील विज्ञान शाखेत महेश संजयकुमार किंगे (८३.२०%), कला शाखेत साक्षी समर कामूलकर (८९.४०%), तर वाणिज्य शाखेत प्रीत शाह (८७.३८%) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
द्वितीय क्रमांक विज्ञान- किंजल शिरीष देशपांडे व सेजल संदीप क्षीरसागर (८२.४६%), नील नार्वेकर (८०.७६%), कला शाखेत सोफिया विल्यम (९०.३०%), आयुष सुतार (८२.७०%), वाणिज्य शाखेत ममता भताने (८४.६१%), वीरेंद्र राजपुरोहित (८४.३०%), तर तृतीय क्रमांक विज्ञान शाखेतून ऋषिकेश चौघुले व अनिश सांगरुळकर (८१.५३%), शंतनू सुदामे (८०.६१%), कला शाखेतून जाई भिलारे (८५.६०%), निधी भाटिया (८७%), वाणिज्य शाखेतून दिपाली रमेश पाल (८३.०७%), बालजसजीत कौर सिंग (८३.०७%) पटकावला.