राजीव गांधी पुण्यतिथीनिमित्त हेमंत देसाई, अनंत बागाईतकर यांची व्याख्याने
पुणे : राजीव गांधी स्मारक समिती, मिशन राजीव, पुणे शहर काँग्रेस व गोपाळदादा तिवारी मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सभा व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांचे ‘राजीव गांधी – जोखीम घेणारा पंतप्रधान’ या विषयावर, तर ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक अनंत बागाईतकर यांचे ‘राजीव गांधी यांची प्रासंगिकता’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. राज्याचे माजी मंत्री आणि अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य बाळासाहेब थोरात या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
मंगळवार, दि. २१ मे २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता कमिन्स सभागृह, पत्रकारभवन, नवी पेठ, पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, आमदार शरद रणपिसे, डॉ. विश्वजित कदम, अनंतराव गाडगीळ, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, दीप्ती चवधरी आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संयोजक गोपाळ तिवारी यांनी दिली आहे.