पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा व वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशन (डब्ल्यूआयसीएएसए-विकासा) पुणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ‘मेगा सीए करिअर काउंसलिंग’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी (दि. ३० मार्च २०१९) सकाळी १० ते १ या वेळेत काळे सभागृह, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, बीएमसीसी रोड, डेक्कन जिमखाना पुणे येथे हे मार्गदर्शन शिबीर होणारआहे. दहावी, अकरावी, बारावी उत्तीर्ण, परीक्षा दिलेल्या आणि सीए होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, तसेच पालकांसाठी हे करिअर कौन्सिलिंग महत्वपूर्ण ठरणार आहे. हे करिअर मार्गदर्शन शिबीर सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे, अशी माहिती ‘आयसीएआय’ पुणेच्या अध्यक्षा सीए ऋता चितळे व ‘विकासा’चे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘आयसीएआय’तर्फे मोफत ‘सीए करिअर कौन्सिलिंग’
सीए ऋता चितळे म्हणाल्या, “सनदी लेखापाल परीक्षेविषयी लोकांच्या मनात अनेक समज-गैरसमज आहेत. ते दूर व्हावेत, तसेच या परिसक्षेची तयारी कशी आणि केव्हापासून करावी, याविषयी या मार्गदर्शन शिबिरात तज्ज्ञ सांगणार आहेत. त्याचबरोबर अकाउंट संबंधित इतर करिअर आणि त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम, नोकरी आणि व्यवसायाच्या संधी याविषयी देखील मार्गदर्शन केले जाणार आहे. सीए चंद्रशेखर चितळे, सीए संकेत शहा, सीए प्रीती चांडक यांच्यासह इतर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.” सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ‘विकासा’कडून नियमित उपक्रम, सेमिनार, परिषदा होतात, त्याचाच एक भाग म्हणून हे मार्गदर्शन शिबीर मोठ्या स्वरूपात घेत आहोत, असे धामणे यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी, तसेच विनामूल्य नाव नोंदणीसाठी मोनिका – ८२३७१६६००१ या क्रमांकावर किंवा https://www.puneicai. org/upcoming-events/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे चितळे यांनी नमूद केले.